गव्या नंतर आता त्यापाठोपाठ हरणांचा कळपाचे दर्शन | Pune | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 79

पुण्यात या एकाच महिन्यात गवा दिसण्याच्या घटना दोनदा घडल्या आहेत, त्या पाठोपाठ आता हरणाचा कळपही काल दिसून आल्याने एकच चर्चा सुरु झालीय,
एनडीए जवळील जंगलातून ही हरणे कळपाने जवळच्या सोसायटीत प्रवेश केला, पुण्यातील एनडीए जवळच्या जंगलात वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर आहे. याच जंगलाला लागून शिवण्यातील आशीर्वाद सोसायटी आहे. सोसायटी आणि जंगल यांच्यामधील भिंत कोसळल्याने हरणे थेट सोसायटीच्या आवारात प्रवेश करत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. मात्र आजूबाजूला भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असल्याने हरणांच्या जीवाला धोका पोहचू नये असे स्थानिकांना वाटते. त्या दृष्टीने त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला असून त्यांनीही पाहणी केली आहे. या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी असे पत्र वनविभाग आता एनडीए व्यवस्थापनाला देणार आहे. दरम्यान नागरिक या हरणांना गवत खायला घालत आहेत. आता या हरणांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतोय.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS