मुंबई : तुमच्या, माझ्या, जगभरातील प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या सर्वांच्या मनात आपल्या राष्ट्रध्वजाबाबत एक विशेष आदर हा आहेच. टीव्हीवर एखाद्या गाण्यात, सिनेमा थिएटरमध्ये सिनेमाच्या आधी राष्ट्रगीतासोबत झळकणारा राष्ट्रध्वज किंवा अगदी रस्त्यावरून जात असताना विविध चौकांमध्ये डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज कायमच आपल्याला रोमांचित करतो आपल्या देशाप्रती आपली आपुलकी ही आपसूकच व्यक्त होते.
मात्र ज्याप्रकारे आपण चारचौघात आपल्या राष्ट्र्वाध्वजाबाबत बोलतो, आपल्या राष्ट्रध्वजाबाबतचा आदर व्यक्त करतो, त्याच आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याला आपल्याच राष्ट्रध्वजाबातची माहिती आहे का ? केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक संस्था म्हणून आपण आपला राष्ट्रध्वज वापरताना आपण सर्व नियम पाळतोय का ? तर याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं येईल.
या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात आपल्या अभिमानाचं प्रतीक,आपला राष्ट्र्ध्वज वापरण्याचे काही नियम आणि कायदे.
#RepublicDay #India #FlagCode #Redfort #NarendraModi #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.