कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कित्येकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद पडले. या परिस्थितीमुळे खचून न जाता पुन्हा उभारी घेत कित्येकजण उद्योगाकडे वळले. घे भरारीच्या प्रदर्शनात जवळपास 40 टक्के नव उद्योजक- उद्योजिकांचे स्टॉल्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लॉकडाऊन होण्यापुर्वी अमित कुलकर्णी यांचा ट्रॅव्हल आणि टूरिझमचा व्यवसाय होता. कोरोना काळात व्यवसायाला फटका बसल्यानंतर त्यांनी फुड बिझनेसमध्ये उतरण्याचे ठरविले. सुरवातीला त्यांनी घरगुती पिठे, खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या पत्नी आस्मी यांनी यामध्ये साथ दिली आणि त्यांनी थोडे धाडस करत मराठवाड्यातील खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरु केला. खवय्या पुणेकरांना आणि मराठवड्यातून येऊन पुण्यात स्थायिक झालेल्यानां मराठवाड्यातील खाद्यासंस्कृतीचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. उदगीरचा सुशीला, लोणी धपाटे, थालिपीठ, उस्मानाबादचा काला जामून, जिलेबी, फाफडा हे पदार्थ उपलब्ध असून ग्राहकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.