नाशिकच्या नामांकित हॉटेलमधून ११ युवक-युवतींची सुटका;डांबून मारहाण झाल्याची चर्चा | Nashik | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 2.8K

गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी युवतीची तक्रार गांभीर्याने घेत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्यामार्फत पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमधून ११ युवक- युवतींची मंगळवारी (ता. २) सुटका करण्यात यश आले. या सर्वांना हॉटेल प्रशासनाकडून दमबाजी करत, तुम्ही येथून काम सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांना एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे. दराडे यांनी मंत्री आव्हाड यांना प्रतिसाद देत रवींद्र गामने, रवींद्र चव्हाण आणि पोलिसांच्या मदतीने त्या सर्वांना आपल्या गावी पाठविले. मात्र, या मुलांनी मारहाण झाल्याचा आणि डांबून ठेवल्याच्या प्रकार झाल्याचा इन्कार पोलिसांपुढे करत, ‘आम्हाला आमच्या गावी जायचे आहे’, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा संबंधित हॉटेलवर दाखल केला नाही.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS