बैलाद्वारे दुचाकी ओढत नेत इंधन दरवाढीचा निषेध.| Pune | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 14

पुणे, ता. ५ : शहरात इंधनाचे दर ९३ रुपये प्रतिलिटर झाल्याने दुचाकीस्वारांच्या खिशाला बसणारी झळ वाढली आहे. त्यामुळे बैलाला दुचाकी बांधत ती ओढून चालवत नेत या दरवाढीचा शिवसेनेने शुक्रवारी निषेध केला. तसेच पेट्रोलसह डिझेलही महागल्याने यापुढे रुग्णवाहीकेऐवजी बैलगाडी वापरावी लागेल, असे सांगत बैलगाडीवरच रुग्ण घेऊन जात असल्याची प्रतिकृती निर्माण करण्यात आली होती.
इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शिवसेनेकडून बालगंधर्व चौकात निषेध करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शहर प्रमुख संजय मोरे, शहर संघटिका सविता मोटे, संगीता ठोसर, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, विजय देशमुख, नगरसवेक संजय भोसले, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची अल्हाट, पृथ्वीराज सुतार, निर्मला केंढे, छाया भोसले, दिलीप पोमण आणि बाळासाहेब भांडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS