बीड : राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निषेध करत बहिष्कार करत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली. बँकेत आम्ही वरचढ असल्याने कारस्थाने करुन सुरळीत चालणाऱ्या जिल्हा बँकेला अवसायनात आणून प्रशासक आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. सर्व जागांची निवडणुक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो. न्यायालय व राज्यपालांपर्यंत आम्ही गेलो. मात्र, सहकार मंत्र्यांवर दबाव आणून हवे तसे निर्णय घेतले. औरंगाबाद व परभणी बॅंकेबाबत वेगळा व बीडसाठी वेगळा न्याय का, असा सवालही मुंडे यांनी केला. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.