शनिवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत ४ लाख १ हजार नवे करोनाबाधित सापडले आहेत. जगभरात एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. यासोबतच दिवसभरात ३ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाच्या परिस्थितीनं केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं असल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. बघुयात टास्क फोर्सने नेमकं काय म्हटलं आहे.
#CoronaTaskForce #NarendraModi #lockdown #IndianExpress