‘महाराष्ट्र गाथा’ या वेब-व्याख्यानमालेमध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान झाले. ‘ज्ञानोबा तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी हा प्रमाणग्रंथ देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. तसेच अठरापगड जातीच्या लोकांसह स्त्री आणि शूद्रातिशूद्रांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राच्या संत परंपरेने केले, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
#LoksattaMaharashtraGaatha #SadanandMore #Writer