१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना आवश्यक असलेला लस साठा पुरवणं ही केंद्राची जबाबदारी असल्याचं म्हणत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. सध्या असलेला लसीचा पूर्ण साठा हा ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
#India #Mumbai #Vaccine #Covid19