बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र करोनामुळे मंदिर बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात आयुष्यभर जमा केलेली १ लाख ७२ हजारांची रक्कम चोरट्याने लंपास केल्याने नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते. अशातच परळी पोलीस नाईकवाडेंच्या मदतीला धावून आले आणि अवघ्या काही तासात त्यांना सर्व रक्कम मिळवून दिली.
#VaijnathTemple #Parli #Police