आई-वडिल लाभणे म्हणजे त्या मुलाचे जणू भाग्यच असते. अशा या आईवडिलांना आपण त्या पाल्याचे 'पालक' म्हणतो. जगात वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार, संयम यांसारख्या गोष्टींची शिकवण देणा-या पालकांचा सन्मान करण्यासाठी 'जागतिक पालक दिन' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली.