सावंतवाडी :
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात मी कोणतेही विधान केलेले नाही उलट शुभेच्छा दिल्या.परंतू माझ्या वक्तव्याचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.
केसरकर यांनी नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात टीका केल्यावरून गेले काही दिवस जिल्ह्याचे राजकारण तापले होते यावरून राणे यांनी केसरकर यांना वकिलांच्या वतीने नोटीस बजावणार असल्याचे इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर वर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केसरकर यांना विचारणा केली असता आपली भूमिका मांडली.