परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय