पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालायसमोर विविध मागण्यांसाठी नाभिक समाजाच्यावतीनं आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. लॉकडाउनच्या काळात मोठा आर्थिक फटका हा नाभिक समाजाला सहन करावा लागलाय. दूकानांच लाईट बिल कसं भरायचं हा मोठा प्रश्न सलून व्यावसायिकांसमोर आहे. राज्यात लॉकडाउनच्या काळात 15 व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या सलून व्यावसायिकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची त्वरीत अर्थिक मदत देण्यात यावी, नाभिक समाजास इतर राज्याप्रमाणे अनुसूचित जाती मध्ये SC आरक्षण लागू करून त्यात अॅट्राॅसिटी कायदा लागू करून संपूर्ण आरक्षण लागू करावे, ही मागणी यावेळी करण्यात आली. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #UddhavThackeray