राज्यातल्या विद्यापीठांना पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेता येणे शक्य नाही. राज्यातले कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना परीक्षा घेण्यात अडचणी आहेत अशी भूमिका राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली आहे. परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती सध्या खरोखरच नाही हे वास्तव स्वीकारायचे की केवळ राजकीय विरोध करायचा याचा विचार राज्यातल्या विरोधी पक्षाने करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढतेय. या काळात राज्यभर विविध महाविद्यालयात परीक्षेचे नियोजन करण्यात अनंत अडचणी आहेत हे वास्तव विद्यापीठ अनुदान आयोग, कुलपती आणि राज्यातल्या विरोधी पक्षाने समजून घेतले तर राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे हित साधले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.
#Sarkarnama #UdaySamant #University #Exams #Politics