परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याचा दौरा केला. आशिव, शिवली, मोड व बुधोडा इथे त्यांनी शेतकऱ्यांना संवाद साधला. शेतात सोयाबिन व अन्य पिके वाहून गेली आहेत, माती खरडून गेली आहे. विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी. याबाबत आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा नक्कीच करु असे त्यांनी यावेळी सांगितले.