रामोशी बेरड जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी अशा विविध मागण्या साठी जय मल्हार क्रांती संघटना यांच्यावतीने शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, रामोशी बेरड समाजाचा विकास आराखडा तयार करा, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या चित्रपटासाठी निधी देण्यात यावा,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक व शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संपूर्ण इतिहास समाविष्ट करावा. आद्य क्रांतिविर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारका ला निधी देण्यात यावा, शूरवीर बहिर्जी नाईक यांची नाव गुहागर विजापूर राज्य महामार्गाला देण्यात यावे. रामोशी वतनी जमीन बिनशर्त परत मिळाव्यात अशा आंदोलन कर्त्यांच्या विविध मागण्यासाठी शिरूर तहसीलदार
कार्यालयासमोर रामोशी बेरड समाजाच्या वतीने जय मल्हार क्रांती संघटना यांनी या मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन केले. पूजा शितोळे यांनी या आंदोलनाची माहिती दिली