मुंबई : " चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली...आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही, हे भाजप नेत्याचं खरं दुखणं आहे, म्हणून भाजपचे नेते सारख्या काट्या पेटवतात.." अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.