एखाद्या व्यक्तीपर्यंत जाता येत नसेल,तर त्याच्या सहकार्यापर्यंत जायचं आणि ईडीचा वापर करायचा,हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, हीच ईडी एक दिवस भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही,हे माझं वाक्य लिहून घ्या, असा ठाम विश्वास सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीत आज व्यक्त केला.