मोदी सरकारने केलेले कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाहीत. शेतकरी कमी आणि व्यापारी, मापारी जास्त, असं हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांना ही कायदा पटेल, ते घरी जातील आणि व्यापारी, मापरीच फक्त आंदोलनात उरतील, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले.