मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी उपयुक्त ठरेल अशा 'स्वसंतुलीत विद्युत स्कुटर्स'(#सेगवे) प्रणालीचे गूहमंत्री अनिल देशमुख यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी स्वतः ही स्कुटर चालवून तिच्या कार्यक्षमतेची पाहणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या सेगवे प्रणालीमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान होऊन आणखी जोमाने लोकाभिमुख कार्य करतील, याचा विश्वास देशमुख यानी व्यक्त केला