सातारा : मी उदयनराजे भोसले यांना पराभूत केलेला आमदार असून मी कुरघोड्या करत नाही. आमदार शिंदे यांना पडण्याचा कोणताही प्रयत्न मी केलेला नाही. माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही, असा इशारा भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.