नागपूर : अधिकारी आणि कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी आमदार विधानसभेत एलएक्यू करतात, असे ट्विट खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्या ट्विटचा खुलासा त्यांनीच करावा आणि संजय राऊत यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते सतत बोलतच असतात. जैतापूरमध्ये मोबदला नेमका कुणाला मिळाला, याची माहिती घ्यावी लागेल, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले.