अधिवेशन येताच मंत्र्यांना कोरोना कसा काय? : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांना एकापाठोपाठ कोरोनाची लागण होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. इतके दिवस हे मंत्री फिरत होते. पण एक मार्च रोजी विधीमंडळ अधिवेशन होण्याच्या पूर्वीच ही अनेकांना लागण कशी काय झाली, असा सवाल त्यांनी विचारला.