पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना प्राधान्य दिले. मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, असा अजब दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अब्दुल कलाम यांना मुसलमान म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान, संशोधक म्हणून संधी दिली होती, असेही त्यांनी म्हटले. ते भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित 'युवा वॉरियर्स या कार्यक्रमात बोलत होते.