सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. या आत्महत्येचा तपास करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.