नागपूर ः गृहविलगीकरणात असलेले कोरोनाचे रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. आधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. यावर आयुक्तांनी चांगली उपाययोजना सुचविली आहे. ती म्हणजे, आपल्याकडे स्मार्ट सिटीचे कॅमेरे आहेत. त्याचा उपयोग करून आणि ‘फेस रेकगनायजेशन’चे सॉफ्टवेअर वापरून गृहविलगीकरणातील लोक रस्त्यावर फिरत असल्यास कॅमेऱ्यांद्वारे त्यांची ओळख पटवता येईल. नंतर त्यांना शासनाच्या विलगीकरण केंद्रामध्ये नेण्यात येईल. सध्या प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics