स्टोरीया फूड्स या कंपनीने एक जाहिरात बनवलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह दाखवले गेले आहे, त्याच्या निषेधार्थ आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरीया फुडस कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. स्टोरीया फुडसचे कार्यालय आम्ही बंद पाडू, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.
#youthCongress #Mumbai
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics