पंढरपूर : ‘ये तो अभी सिर्फ झांकी है, पुरा महाराष्ट्र अभी बाकी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगिलेल्या करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. तुम्ही दिवस मोजायला सुरुवात करा. पंढरपूर जिंकल्यानंतर आता राज्यातसुद्धा शंभर टक्के सत्तांतर होईल, असा इशारा पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची जबाबदारी असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीला दिला.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज भाजपचे समाधान आवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. आवताडे यांना १ लाख ०९ हजार ४५० मते मिळाली, तर भालके यांना १ लाख ०५ हजार ७१७ मते मिळाली आहेत. पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी मतदारसंघात तळ ठोकूनही त्यांचा पराभव झाला आहे. या विजयानंतर खासदार निंबाळकर बोलत होते.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics