ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजूने खेळ खेळत आहेत. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचे हे राजकारण त्यांनी बंद करावे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे ही भूमिका सुप्रीम कोर्टात मांडण्याची विनंती केंद्र सरकारला करावी असा सल्लाही ना. नवाब मलिक यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकीलांना 'चीत भी मेरी और पट भी मेरी' यापद्धतीने बोलता येते असा टोलाही ना. नवाब मलिक यांनी लगावला आहे.
#NawabMalik #NCP #BJP #OBC #Marathacommunity #Maharashtra #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics