मुंबई : मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत वाहतूक कोंडी दिसली. ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. सगळे असे वागायला लागले तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईकरांना दिला.
मुंबईतील टर्मिनल १ व टर्मिनल २ येथील नियंत्रित प्रवेश मार्ग प्रकल्पाचे भुमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. तसेच, मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरूवात झाली. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
#MumbaiMetro #UddhavThackeray #AjitPawar #MMRDA #RamdasAthawale #MaharashtraCM #Mumbai #Bhoomipujan
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics