काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले पक्षाच्या आंदोलनात
अँकर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राज्यव्यापी जनसंपर्क दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते आज गडचिरोलीत पोहोचले. नाना पटोले पक्षाच्या इंधन दरवाढविरोधी आंदोलनात सामील झाले. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांचीही आंदोलनात उपस्थिती होती. भाजपचे सरकार शेतकऱ्यांकडूनच कर वसूल करत शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला. मोदी सरकार इंधनावर विविध प्रकारचे कर लादून देशातील जनतेची लूट करत असल्याचा आरोप करत ही लूट थांबविण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लूट न थांबल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पटोले यांनी दिला.
बाईट : नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
#NanaPatole #Gadchiroli
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics