ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच 'एआयएमआयएम'. खासदार असदुद्दीन ओवेसी हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. हैद्राबाद हा त्यांचा बालेकिल्ला. त्यांच्या आजोबांपासून त्यांना राजकीय वारसा आहे. वडील आमदार आणि खासदारही होते. 2004 पासून ओवेसी हैद्राबादचे खासदार आहेत. मागील काही वर्षांपासून ओवेसी यांनी अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून लोकसभेच्या निवडणुका लढविण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रामध्येही त्यांचा एक खासदार निवडूण आला आहे. तसेच येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ओवेसी यांच्या पक्षाने हातपाय पसरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्येही एमआयएमने प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये महत्वाचे ठिकाण मानले जाणाऱ्या गोध्रा नगरपालिकेत या पक्षाचे सात उमेदवार निवडून आले आहेत. तसेच महापालिका व अन्य नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये एमआयएमने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
#Aimim #AimimParty #Politics #AssauddinOwaisi #SarkarnamaExclusive #Maharashtra #India #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics