ज्येष्ठ पौर्णिमेला \'वटपौर्णिमा\' साजरी केली जाते. खरंतर हे त्रिरात्री व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. मात्र तीन दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. पतीला दिर्घायु्ष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा, यासाठी हे व्रत केले जाते.