चिखलऱ्यातील स्कायवॉकसाठी नवनीत राणांचे आदित्य ठाकरेंना पत्र
अमरावती : आदित्यजी... आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. वाटत असेल तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील स्कायवॉकलाही माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र; काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.