कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी उचंगे आहेत. भुजबळ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बिंदू चौकात ओबीसी आरक्षणावर चर्चेसाठी यावे. असे जाहीर आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. दाभोळकर कॉर्नर येथे भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
भाजप कार्यकर्ते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर येथे एकत्र आले. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दाभोळकर चौकामध्ये मानवी साखळी करून चक्काजाम करण्यात आला.
बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ - बी. डी. चेचर
#RastaRokoAndolan #KolhapurRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Kolhapur #ChandrakantDadaPatil #ChaganBhujbal