कोल्हापूर : शासन निर्णय देवो अगर न देवो सोमवार (ता.५)पासून कोणत्याही परिस्थितीत सर्व दुकाने सुरू करायचीच असा ठाम निर्धार आज जनता बझार चौकात झालेल्या व्यापाऱ्यांच्या कोपरा सभेत घेण्यात आला. तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या (ता.४) महाद्वार रोडवर सकाळी दहा वाजता सर्व व्यापारी एकत्रीत येवून बैठक घेण्यात येईल, असाही निर्णय झाला. तसेच पोलिसांनी अरेरावी केल्यास पोलिस ठाण्या जवळ जावून निषेध व्यक्त करण्याचा ही निर्णय घेण्यात आला.
व्हिडिओ बी.डी.चेचर
#Kolhapur #CancelLockdown #RajarampuriMarketCommittee #Agitationinkolapur