'महाविकास आघाडी एकमेकांची फसगत करीत आहे' | Ashish shelar|Satara |maha vikas aghadi | BJP|Sakal Media

Sakal 2021-07-11

Views 1.2K

'महाविकास आघाडी एकमेकांची फसगत करीत आहे' | Ashish shelar|Satara |maha vikas aghadi | BJP|Sakal Media
सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार येत्या रविवारी (ता. ११) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही कानमंत्र देणार आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बूथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. या दौ-यात आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीकासत्र सोडले.
(प्रमोद इंगळे : सातारा)
#AshishShelar #Satara #BJP #Politics #Nagarpanchyatelection

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS