मुसळधार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात ही भरले. ज्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सध्या पावसाचे पाणी उपसून गाळणी आणि उदंचन यंत्रणा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे.