Satara : पारंपरिक भलरी वर भात लावणीला वेग |Traditional song | Rice planting |Sakal Media
कास (सातारा) : भातलावणीस वेगाने सुरुवात झाली असून, शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा ..रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी.. माझ्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं, ध्यान मला रामाचं.. मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते.. कुणाला तू ओढीत होतीस, कुणाला तू सोडीत होतीस, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी..!अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादत आहेत. कास, बामणोलीसह जावली, महाबळेश्वर तालुक्यातील पश्र्चिम भागात घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. (व्हिडिओ - सुर्यकांत पवार)
#Satara #Riceplanting #Traditionalsong #bhalarisong #Maharashtra