Heavy Rainfall In Kolhapur, Floods Roads : पावसाचे पाणी घुसले कॉलनीत

Sakal 2021-07-22

Views 564

Heavy Rainfall In Kolhapur, Floods Roads : पावसाचे पाणी घुसले कॉलनीत

Kolhapur : मुसळधार पावसामुळे रामानंदनगर ओढ्यालगतच्या सुमारे सत्तरहून अधिक घरांत आज सकाळी पुराचे पाणी शिरले. ज्येष्ठ नागरिक, प्रापंचिक साहित्य व अंगणातील कुंड्या, पिंप यांची आवराआवर करताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान शेती फार्म येथील महापालिका प्रशासन कधी पडणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान सुर्वेनगर भागात ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले असून श्रीकृष्ण नगर, जनाई दत्त नगर कॉलनीतील घरांत पाणी शिरले आहे. शहरात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले असून सखल भागातील कॉलनीत घराच्या compound मध्ये पाणी शिरले आहे. देवकर पानंद येथील चौकात पाणी साचले आहे. नागरिक या पाण्यातून वाट काढत वाहतूक करत आहेत. येथील शाहूपुरी कुंभार गल्लीत पुराचे पाणी आले आहे.

बातमीदार - संदीप खांडेकर
व्हिडीओ - मोहन मेस्त्री

#heavyrain #floods #kolhapur

Share This Video


Download

  
Report form