Bhimashankar Temple : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराला पावसाच्या पाण्याचा वेढा ; शिवलिंग मंदिरातही शिरले पाणी
Phulawade (Ambegaon, Pune) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराला सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने वेढा घातला असून शिवलिंग मंदिरात देखील पाणी शिरले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात अतिवृष्टी होत असून गुरुवारी रात्री पावसाच्या पाण्याने मंदिराला वेढा दिला असून मंदिराच्या गाभाऱ्यात देखील पावसाचे पाणी शिरले आहे. भीमाशंकर मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या डोंगरातून पुराचा लोट हा मंदिर परिसरात आल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून मंदिर परिसरात आला असून शिवलिंग देखील पाण्याखाली गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
#bhimashankartemple #pune