सातारा : सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या " लक्ष्मी - विलास पॅलेस " या निवासस्थानी प्रवीण जाधव यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आला. त्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
#pravinjadhav #archerypravin #olympicgames2020 #olympicgames #archery #pravinjadhavfaltan #faltantaluka #sharadpawar