सिंदखेड राजा (जि. बुलडाणा)(Buldhana) : मागच्यावर्षी बोगस बियाणे व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊनही राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करीत आहे. दुसरीकडे अतिवृष्टीची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे शेतकरी पार खचला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र व राज्य सरकाराचे लग्न लावून दिले. या लग्नात केंद्र सरकारकडून वर तर राज्य सरकारकडून वधू उपस्थित होती. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावरून दोघांची वरात काढून सिंदखेड राजा तहसील कार्यालयात लग्न लावण्यात आले. यावेळी नवरदेव, नवरी व वराती यांचा आंदोलनामध्ये सहभाग होता.
#buldhana #buldhananews #buldhanaliveupdates #buldhanaupdteas #unniquemarriage