राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना मोठमोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. छोट्या शहरातील किंवा गाव खेड्यातील महिलांपुढे मुंबई,पुणे यांसारख्या शहरात आल्यावर निवासाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महिलांना नोकरी करणं अथवा नोकरी, व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. महिलांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये शासकीय वस्तीगृह निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
#women #hostel #employees #MaharashtraGovernment