कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ‘माझं कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर' बनविण्याचे आवाहन त्यांनी येथे ध्वजारोहण सोहळ्यानंतर केले. ऑलंपिक मध्ये पदक विजेत्यांसह, कोरोना योद्धा, स्वातंत्र्यसैनिकांचेही त्यांनी अभिनंदन करून देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बातमीदार- लुमाकांत नलवडे
व्हिडिओ- बी.डी.चेचर
#satejpatil #kolhapur #kolhapurnews #kolhapurliveupdates #kolhapurnewsupdates #independenceday #independenceday2021