Self Incineration By Members Of Chhawa Sanghatana : नांदेडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न

Sakal 2021-08-19

Views 2.3K

Self Incineration By Members Of Chhawa Sanghatana : नांदेडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न

Nanded : छावाचे (Chhawa) जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी (ता. १९ ऑगस्ट) अंगावर पेट्रोल टाकून घेतलं. मात्र या आंदोलनाची कल्पना असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांच्या जवळील पेट्रोलची कॅन जप्त केली. 'एकच मिशन मराठा आरक्षण' अश्या घोषणा देत छावाच्या (Chhawa) कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. यावेळी पोलिसांनी छावाच्या (Chhawa) कार्यकर्त्याना अटक करून वजीराबाद पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान, शुक्रवारी (या. २०) छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड (Nanded) मध्येच मराठा समाजाच्या मागण्यासाठी मूक मोर्चा आंदोलन आहे. त्या पार्श्वभूमीवर छावाने (Chhawa) मात्र ठोक मोर्चाच्याच भूमिकेचा आग्रह धरत आजचे आंदोलन केलय. मराठा आरक्षणासाठी आता मूक आंदोलनाला काही अर्थ नाही अशी भूमिका असल्याचे छावाच्या (Chhawa) जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी स्पष्ट केलंय.

Video : करणसिंह बैस

#Chhawa #Nanded

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS