Islampur : पडळकरांच्या बैलगाडी शर्यतीला 'सोन्या'ची हजेरी |Bullack cart race |Padalkar |Sakal Media
इस्लामपूर (Islampur) : शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली (Ban on bullock cart races)आहे. ही बंदी उठवावी व शर्यती पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी झरे (ता .आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान सुरु केले आहे. दरम्यान शुक्रवार 20 ऑगस्टला येथे बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले आहे. शासनाने झरे आणि या परिसरातील 9 गावात संचारबंदी घोषित केली आहे. मात्र पारेकरवाडी येथे ती लागू केलेली नाही. खिलार महाराष्ट्रातील बैलाची जात नामशेष होऊ नये म्हणून शेतकरीही या शर्यतींसाठी आग्रही आहेत. शासनाने बंदी घालून सुद्धा झरे (ता. आटपाडी) येथील शेतकरी शर्यतीसाठी बैल गोठ्यातून बाहेर काढत आहेत. वाटेगाव (ता. वाळवा) येथील गाजलेला मोठा 'सोन्या बैल' घेऊन शेतकरी निघाले आहेत.
#Islampur #GopichandPadalkar #bullockcartraces #Maharashtra