Raksha bandhan :बियांपासून राखी! कोल्हापूरच्या वर्षा-अभिजित यांची कमाल | kolhapur | Sakal Media |
कोल्हापूर (kolhapur): गेल्या काही वर्षात पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच तंत्र कौशल्याचा वापर करून मनोहरी राख्या बनवल्या जात आहेत. त्याचा अधिक आत्मीयतेने वापर सुद्धा केला जात आहे. मात्र यंदा काही कल्पक भगिनींनी निसर्ग पूरक राख्या तयार केल्या असून या राख्यांना भाजीपाल्यापासून वनौषधी झाडे यांच्या बिया वापरल्या आहेत. कोल्हापुरातून बीचराखी सोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया हे ब्रीदवाक्य घेऊन गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या वर्षा वायचळ आणि वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष अभिजीत वाघमोडे यांनी यंदा पर्यावरणपूरक तसेच निसर्गाच्या समृद्धतेची वाट दाखवणार्या देशी वाणांच्या राख्या बनवल्या आहेत. यांना लक्ष्मी मिसळचे अमोल गुरव यांचे सहकार्य लाभले आहे. (बातमीदार अर्चना बनगे) (व्हिडिओ- बी.डी.चेचर) (Rakhi from seeds)
#kolhapur #Rakshabandhan #Rakhi #Rakhifromseeds