Narayan Rane: 'राणेंचे आक्षेपार्ह वक्तव्य' | Sudhakar Badgujar |Shivsena | Nashik| Sakal Media |
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणेनी (narayan rane) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक दाखल झाले आहे. राणेंना लवकरच नाशिकला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आजच्या दिवसभरातील घडामोडींवर माहिती शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली. राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापला आहे. दरम्यान काल (ता.२२) बडगुजर यांनी रात्री 1 वाजता तक्रार दाखल केली होती
#NarayanRane #Nashik #Uddhavthackeray #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #Shivsainik